पालारनदी
पालारनदी : दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांतून वाहणारी नदी. लांबी ३७० किमी. जलवाहन क्षेत्र २,६८४ चौ.किमी. कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्यात नंदीदुर्ग टेकडयांमध्ये उगम पावून प्रथम आग्नेयीस व पुढे दक्षिणेस सु. ७५ किमी. वाहत जाऊन आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात प्रवेश करते.